१ जून २०२१ रोजी विश्व ब्राह्मण दिवसाचे औचित्य साधून आनंदीयोग ब्राह्मण वधू वर सूचक केंद्र या महाराष्ट्रातील नामांकित विवाहसंस्थेची स्थापना पुणे येथे केली. ही संस्था भारतातील सर्व शाखेच्या ब्राह्मण वधू-वरांसाठी आहे.
अखंड हिंदू राष्ट्राच्या उभारणीसाठी आणि ब्राह्मण समाजातील मुलामुलींची लग्ने जमविण्यास येणाऱ्या अडचणींचा विचार करून सदर विवाह संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
आनंदी योग वधू वर सूचक केंद्राचे वतीने प्रत्येक वर्षी दर ३ महिन्यातून एकदा मुला/मुलींचा परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. केंद्राचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात आले असून केंद्राची स्वतंत्र वेब साईट https://www.anandiyog.com या नावाने सुरु करण्यात आली असून त्याद्वारे सभासदांना अनुरूप माहिती मिळवणे सहज शक्य झाले आहे.
आमच्या संस्थेस ब्राह्मण समाजातील सर्व पालकांचे प्रेम/विश्वास आत्तापर्यंत जसा मिळाला तसाच पुढे मिळत राहो. केंद्राच्या या सुविधांमुळे व माध्यमातून पालकांना आपल्या पाल्यासाठी विवाह जमविल्यास फार मोठा आधार मिळाल्याने अल्पावधीतच सदर केंद्राचा नावलौकिक महाराष्ट्रात आजमितीस असून त्यासाठी सौ. आनंदी बाळासाहेब यांचे फार मोठे योगदान आहे. आनंदी योग ब्राह्मण वधू वर सूचक केंद्र या विवाह संस्थेच्या कामकाजाविषयी समाजबांधवांच्या काही सूचना अभिप्राय असल्यास त्या संस्थेला अवश्य कळवाव्यात. आपल्या विधायक सूचनांचा निश्चितच समावेश मंडळाच्या कामकाजांत करण्यात येईल.
- धन्यवाद
आनंदी योग ब्राह्मण वधू-वर सूचक केंद्र